अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर हाजी इम्तियाज अहमद अब्दुल सत्तार पालकर यांचा विविध स्तरांतून सत्कार होत आहे. त्याच अनुषंगाने अलिबाग शहराचे माजी नगराध्यक्ष प्रशांत शेठ नाईक व नगरसेवक अनिल शेठ चोपडा यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष नाईक यांनी पालकर यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत समितीच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. नगरसेवक चोपडा यांनीही त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत सामाजिक सलोखा, शिक्षण व प्रगतीसाठी समितीने पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले.
हाजी इम्तियाज पालकर यांनी मान्यवरांचे आभार मानत, समितीच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदत, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले. समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या भेटीमुळे स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या अध्यक्षांकडून समाजहिताच्या विविध उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






