डोलवी येथे गांजासह एक जण अटक; वडखळ पोलिसांची कारवाई


पेण (प्रतिनिधी): पेण तालुक्यातील डोलवी परिसरात अमली पदार्थविरोधी कारवाई करत वडखळ पोलिसांनी गांजासह एका संशयितास अटक केली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 47/2026 नोंद करण्यात आला असून, NDPS ॲक्ट 1985 अंतर्गत कलम 8(क) व 20(ब) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 2 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10.20 वाजण्याच्या सुमारास डोलवी येथील JSW गोवा गेटसमोरील हायवे लगत असलेल्या चिकन दुकानांच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी राजा जुमराती मिया अली (वय 30), सध्या रा. डोलवी, ता. पेण (मूळ रा. बंसंतपूर, ता. चैनपूर, जि. मुजफ्फरपूर, बिहार) याच्या ताब्यातून सुमारे 33,300 रुपयांच्या किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
सदर आरोपी हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुंडलिक मधुकर बांगर (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल दिनेश ढेने, प्रशांत देसाई, रुपेश कोंडे तसेच पोलीस शिपाई आकाश कुथे, रामनाथ ठाकूर आणि बांगर यांनी संयुक्तपणे केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे करत आहेत.