अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडून ॲड. मिलिंद चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अलिबागमधील नावाजलेल्या जयभवानी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद चव्हाण यांना त्यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले.
यावेळी प्रशांत नाईक यांनी सांगितले की, ॲड. मिलिंद चव्हाण यांनी जयभवानी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आधार देण्याचे काम केले आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने विश्वासार्हता आणि प्रगतीची नवी उंची गाठली आहे.
तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घटकांना मदतीचा हात दिला असल्याचेही नाईक यांनी नमूद केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील कार्यासाठी भरभरून यश लाभावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या प्रसंगी जयभवानी पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सहकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही ॲड. मिलिंद चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अलिबाग परिसरात त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.