अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरातील एका महिलेच्या तक्रारीवरून मुस्लिम समाजातील एका व्यक्तीविरुद्ध विनयभंग आणि बलात्कारासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील आरोपी आणि तक्रारदार हे एकाच समाजातील असल्याचे समोर आले आहे.
प्रकरण संवेदनशील स्वरूपाचे असल्याने संबंधित व्यक्तींची ओळख उघड करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू असून तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Home ताज्या बातम्या महिलेच्या तक्रारीनंतर विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल; अलिबाग पोलिसांकडून तपास सुरू”





