बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरात पोलिसांकडून रूट मार्च


अलिबाग (प्रतिनिधी): येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ७.१५ या वेळेत शहरात रूट मार्च पार पडला. अलिबाग पोलीस ठाण्यातून सुरू झालेला हा मार्च ॲक्सिस बँक, पोस्ट ऑफिस कॉर्नर, मांडवी मोहल्ला, चिराग मशिद, कोळीवाडा, शिवलकर नाका, जामा मशीद, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, घरत आळी आणि ब्राह्मण आळी या परिसरातून काढण्यात आला.

यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच बारा गृह रक्षक दलाचे जवान उपस्थित होते. पोलिसांनी नागरिकांना सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद घटना आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले.