शेकापला खारेपाटात धक्का; अमित नाईक यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सुशील पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


अलिबाग(प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर तसेच अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे प्रतोद अमित नाईक यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत सारळ ग्रामपंचायत परिसरातील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार असलेले सुशील पाटील यांच्यासह महेंद्र थळे, पार्थ पाटील, चेतन पाटील (नवखार), साई भगत, सनी पाटील, विश्वास पाटील (मिळकतखार), जगदीश म्हात्रे, गणेश ठोंबरे आणि वसंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते सुशील पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “गेली ३८ वर्षे शेतकरी कामगार पक्षात प्रामाणिकपणे काम केले. पक्ष वाढीसाठी सातत्याने योगदान दिले. मात्र पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी प्रक्रियेदरम्यान पक्षाकडून वारंवार नाराजी आणि अडचणींचा सामना करावा लागला.”
या प्रवेशामुळे सारळ आणि परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकरी कामगार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. प्रवीण ठाकूर, जिल्हा परिषदेचे गट नेते अमित नाईक,प्रदेश सरचिटणीस हर्षद पाटील, जिल्हा सर चिटणीस चारुहास मगर, चिटणीस आशिष भट,अलिबाग तालुका महीला अध्यक्षा आरती मोकल,ओबीस सेल तालुका अध्यक्ष वैभव पाटील, पशुराम म्हात्रे, मितेश पाटील अल्पेश पाटील, संजय पाटील, सुनील पाटील, तेजस पाटील, हरेश सुर्वे, मंगेश बरे, प्रविण अंबाडे, मोहन म्हात्रे, निमीष पाटील, पाटील साळुंखे, विकास म्हात्रे,विनायक पाटील, जितेंद्र मोकळ आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.