खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग तालुका पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न 95 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव


अलिबाग (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली अलिबाग तालुका पाककला स्पर्धा रविवारी (दि. 19 जुलै) महात्मा गांधी विद्यालय, हाशिवरे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. अलिबाग तालुक्यातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद अमित नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्पर्धक महिलांशी संवाद साधत त्यांच्या पाककला कौशल्याचे कौतुक केले. महिलांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आणि त्यांना स्वावलंबन व सक्षमीकरणाची प्रेरणा देणारे असे उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अलिबाग तालुका अध्यक्षा सौ. आरती मोकल यांनी केले. यावेळी खारेपाट विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते परशुराम पाटील, मितेश पाटील, सारळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय पाटील, सुशील पाटील, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या दया पाटील, मीनाक्षी पाटील, शोभा मोकल, आरती म्हात्रे, मानकुळे ग्रामपंचायत सदस्या पायल पाटील, सुप्रिया थळे, संतोष पाटील, गणेश मोकल, वैजाळीचे माजी सरपंच विद्याधर ठाकूर, बिपिन मोकल, अजित मोकल, योगेश पाटील, करण मोकल, सूत्रसंचालन निलेश ठाकूर यांनी केले. तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत तब्बल 95 महिला स्पर्धकांनी विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ सादर करत आपल्या पाककलेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. परीक्षकांनी चव, सादरीकरण, नावीन्य आणि स्वच्छता या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन केले.
स्पर्धेतील विजेते :
प्रथम क्रमांक : नूतन रणजीत मोकल
द्वितीय क्रमांक : पायल भालचंद्र म्हात्रे
तृतीय क्रमांक : तन्वी नितीन चौधरी
उत्तेजनार्थ (चतुर्थ) : रेश्मा वैभव पाटील
स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रे व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत अशा स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.