प्रफुल्ल पाटील यांना ग्राम समृद्धी सन्मान पुरस्कार प्रदान


कार्लेखिंड (प्रतिनिधी): प्रफुल्ल रोहीदास पाटील यांना ग्राम समृद्धी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. गृप ग्राम पंचायत, परहूर माजी सरपंच, प्रफुल्ल पाटील यांना नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षणा दरम्यान त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आदर्श सरपंच म्हणून निवड करण्यात आली. या अनुषंगाने ग्राम समृद्धी सन्मान पुरस्कार २०२६, पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे प्रदान करण्यात आला.