६ जुलै रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन


रायगड-अलिबाग(जिमाका): सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो.
त्यानुसार जिल्हास्तरावरील माहे जुलै २०२६ चा लोकशाही दिन सोमवार दि.६ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १.०० वा. जिल्हाधिकारी कार्याकायच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. अर्जदाराने आपल्या वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारीचे निराकरण करण्याकामी लोकशाही दिनाकरिता अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. अर्जदारांनी प्रथम तालुकास्तरावर तहसिल कार्यालयाकडे लोकशाही दिनात अर्ज सादर करावा. तालुकास्तरीय लोकशाही दिनात ३० दिवसात कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावर अर्ज करता येईल, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.