नवखार – मोरपाडा येथील आत्माराम पाटील यांचे निधन


अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील नवखार मोरापाडा येथील आत्माराम शंकर पाटील यांचे बुधवार दिनांक २४ जून २६ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी मेंदुविकाराच्या झटक्याने एम जी एम कळंबोली येथे निधन झाले.
आत्माराम पाटील हे उत्तम शेतकरी होते. सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत होते. त्यांच्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे ते खारेपाठ विभागा मध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. शेतकरी म्हणून आयुष्याची वाटचाल करत असताना शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग कसे करता येईल या बाबत मित्रमंडळी ना एकत्र करून चर्चा करणे त्यांना आवडायचे.नेहमी हसत खेळत व्यक्तिमत्व असल्याने समवयस्क मित्र मंडळी सह बसलेले दिसायचे.
आत्माराम पाटील यांना उन्हाच्या त्रासा मुळे मेंदविकार झाला म्हणून त्यांना अलिबाग व तेथून एम जी एम कळंबोली येथे दाखल करण्यात आले.तेथे उपचार सुरू असताना पहाटे मेंदूविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नवखार मोरापाडा येथील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली,तीन सुना , सहा नातवंडे,असा खूप मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मोरापाडा समुद्रकिनारी व होम हवन राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले आहे.