नागावमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहात प्रारंभ


नागाव (प्रतिनिधी) : नागाव येथे रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नागावचे माजी सरपंच आदरणीय श्री. नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

मोहिमेअंतर्गत नागाव प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच परिसरातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पाच वर्षांखालील बालकांना मोफत पल्स पोलिओ लसीचे दोन थेंब देण्यात येत आहेत. पोलिओसारख्या गंभीर आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक बालकाला ही लस देणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी सर्व पालकांना आपल्या पाच वर्षांखालील मुलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा अंगणवाडी केंद्रात घेऊन जाऊन पल्स पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजण्याचे आवाहन केले.

“दोन थेंब जीवनाचे” या संदेशातून पोलिओमुक्त नागाव आणि पोलिओमुक्त भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.