रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या एकूण ३७९.८९१ किलो अमली पदार्थांचा नाश करण्यात आला. या अमली पदार्थांची एकूण किंमत ३ कोटी २६ लाख १० हजार ६३४ रुपये इतकी होती. जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल २७ गुन्ह्यांतील मुद्देमालाचा यात समावेश होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जुलै २०२६ रोजी नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट (Re-Sustainability Ltd.) येथे करण्यात आली. जप्त अमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, कोकेन आणि केटामाईनचा समावेश होता.
जिल्हास्तरीय अमली पदार्थ नाश समिती, शासकीय पंच, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई पार पाडण्यात आली.






