अलिबाग (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे अलिबाग एसटी आगारात साचलेल्या चिखल, गाळ आणि कचऱ्यामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब वाहन निरीक्षक दिलीप पालवणकर यांनी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने पाहणी करत स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून स्वच्छता मोहीम राबविली.
अल्पावधीत आगारातील गाळ व चिखल हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना तसेच एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या तत्पर सहकार्याबद्दल अलिबाग आगार प्रशासन, दिलीप पालवणकर आणि एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशांत नाईक यांचे आभार मानले.
यावेळी प्रशांत नाईक म्हणाले, “सार्वजनिक ठिकाणी समस्या निर्माण झाल्यानंतर जबाबदारीवर चर्चा करण्यापेक्षा तातडीने उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, हेच आमचे प्राधान्य असून भविष्यातही असेच सहकार्य सुरू राहील.”
Home ताज्या बातम्या प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने अलिबाग एसटी आगार स्वच्छ; प्रवासी व कर्मचाऱ्यांना दिलासा





