राजिपमध्ये स्व. अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन


अलिबाग(प्रतिनिधी): राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेत त्यांना बुधवारी (ता.22) अभिवादन करण्यात आले. राजिपचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील यांनी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी दिलेले योगदान, त्यांची दूरदृष्टी आणि जनसेवेची तळमळ सदैव सर्वांनाच प्रेरणादायी राहील, असे विचार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.