
सोगाव (अब्दुल सोगावकर) :अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी अलिबाग शहरातील विविध माध्यमांच्या वृत्तपत्र कार्यालयांना नुकतेच पावसाळी छत्र्यांचे वाटप केले.
आपल्या परिसरातील घडणाऱ्या ताज्या ठळक घडामोडी व प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन बातम्यांचे संकलन करून त्या जनतेपर्यंत लवकरात लवकर पोहचविण्यासाठी पावसाळ्यात अधिक प्रमाणात सोयीस्कर व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी पत्रकारांप्रती आपुलकी व असलेली सामाजिक बांधिलकी म्हणून अलिबाग शहरातील सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयांना छत्र्यांचे वाटप केले. यावेळी सचिन घाडी यांचे सर्व पत्रकारांनी आभार मानले आहेत.





