चौल (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील पंतनगरची श्रावणी अमर थळे हिने देशातील प्रतिष्ठित आयआयईएसटी (IIEST) शिबपूर येथे एरोस्पेस इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवत आपल्या अंतराळ क्षेत्रातील स्वप्नाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भविष्यात इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून देशसेवा करण्याचे तिचे ध्येय आहे.
श्रावणीने २०२४ मध्ये पनवेल येथील सी.के.टी. विद्यालयातून दहावीच्या परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवत रायगड जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला होता. बारावीनंतर जेईई ॲडव्हान्समधील कामगिरीच्या जोरावर तिला आयआयईएसटी शिबपूरमध्ये प्रवेश मिळाला. अभ्यासाबरोबरच ती भरतनाट्यममध्येही सुवर्णपदक विजेती आहे.
वडील अमर थळे आणि आई रिना थळे यांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाल्याचे श्रावणीने सांगितले. अंतराळ संशोधन क्षेत्रात कार्य करून इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याचे तिचे स्वप्न असल्याची भावना तिने व्यक्त केली.
Home ताज्या बातम्या स्वप्न अंतराळाचं, ध्येय इस्त्रोचं! श्रावणी थळेची एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी आयआयईएसटी शिबपूरमध्ये निवड





