कोल्हापूर(प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज कोल्हापूर येथे काँग्रेस नेते श्री. सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्वर्गीय डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांनी पाटील परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. स्वर्गीय डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांनी पाटील कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
स्वर्गीय डी. वाय. पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली.






