नागाव बीच येथे २१ ऑगस्टला भव्य नारळ फोडी स्पर्धा


अलिबाग (प्रतिनिधी) : डॉ. सचिन शरद राऊळ व श्री. राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने नागाव बीच, अलिबाग येथे २१ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य नारळ फोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे परिसरातील नारळ फोडीच्या पारंपरिक खेळाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

स्पर्धेचे आयोजन दोन गटांत करण्यात आले असून, दुपारी २ वाजता ‘गडगडी नारळ फोडी स्पर्धा’, तर संध्याकाळी ६ वाजता ‘हातावरची नारळ फोडी स्पर्धा’ होणार आहे. गडगडी स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १ हजार रुपये, तर हातावरची स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

गडगडी स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट मारकेरीसाठी आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. हातावरची नारळ फोडी स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या नोंदणीसाठी २० ऑगस्ट २०२६ ही अंतिम तारीख असून, स्पर्धकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेसाठी विपुल राऊळ – ७७९८६४२२१४ आणि शैलेश नाईक – ९८५०२३१५९५ यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. स्पर्धेचे ठिकाण श्री सोमेश्वर मंदिर क्रीडांगण, नागाव बीच जवळ, अलिबाग, रायगड असे आहे.

या पारंपरिक नारळ फोडी स्पर्धेत परिसरातील तसेच जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सचिन शरद राऊळ व श्री. राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.