अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील दिलीप पाटील यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते ६६ वर्षांचे होते.
मितभाषी, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाचे दिलीप पाटील हे सर्वांच्या सुख-दुःखात सक्रिय सहभाग घेणारे व्यक्तिमत्त्व होते, ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वरसोली परिसरात, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आली.
गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी वरसोली येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दीपाली पाटील, दोन मुले नितीश व मयूर पाटील, सुना, नातवंडे तसेच इतर कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.
दशक्रिया विधी (दहावे) शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता वरसोली येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती पाटील कुटुंबीयांकडून देण्यात आली.








