अलिबाग (प्रतिनिधी): राष्ट्रीय केमिकल अॅण्ड फर्टिलायझर आणि क्षितीज मल्टीपर्पज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत शहापूरच्या हद्दीमधील ५ अंगणवाड्यांना साहित्यवाटप करण्यात आले. तसेच महिलांसाठी आरोग्यविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले.
गुरुवारी (दि. २०) हा कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत शहापूर कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. अलिबाग पंचायत समितीच्या सभापती सौ. भाग्यता नंदन पाटील यांच्या हस्ते अंगणवाड्यांना साहित्य वाटप करण्यात आले . क्षितीज मल्टीपर्पज असोसिएशनच्या संस्थापिका सौ. शीतल माळी यांनी महिलांना पोषण आहार आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. ग्रुप ग्रामपंचायत शहापूरच्या प्रशासक सौ. त्रिशाली सोनवडेकर, शहापूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य स्वप्नील पाटील यावेळी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटातील महिला, ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी गणेश म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर म्हात्रे, महेश पाटील, सौ. सुविधा मोकल, सौ. ममता मोकल यांनी परिश्रम घेतले.









