मानाच्या दहीहंडीला Gen-Z ची नवी दिशा


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबागच्या २४ वर्षांच्या मानाच्या दहीहंडी उत्सवाला यंदा आधुनिकतेची जोड मिळणार आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक आघाडी व प्रशांत नाईक मित्र मंडळातर्फे उत्सव अधिक भव्य व युवककेंद्रित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा गोविंदा स्पर्धेसोबत ‘Reel Star’ स्पर्धेचाही समावेश करण्यात आला आहे.

शेतकरी भवन येथे झालेल्या नियोजन सभेत अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली तयारीचा आढावा घेण्यात आला. पुरुष गोविंदा पथकासाठी प्रथम क्रमांकाचे २ लाख ५१ हजार रुपये व मानाचा चषक, तर महिला पथकासाठी १ लाख १ हजार रुपये व मानाचा चषक देण्यात येणार आहे. ‘Reel Star’ स्पर्धेत प्रथम ११ हजार, द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

२५ ऑगस्टपासून अर्ज उपलब्ध

स्पर्धेचे अर्ज २५ ऑगस्ट २०२६ पासून शेतकरी भवन, अलिबाग येथे उपलब्ध होणार असून गोविंदा पथके व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.