आदर्श पतसंस्थेतर्फे गणपती सणा निमित्त लहान मुलांसाठी गणपती स्तोत्र स्पर्धा


अलिबाग (प्रतिनिधी):  आदर्श  नागरी सहकारी पतसंस्था, अलिबाग यांच्यातर्फे  आदर्श मध्ये अनन्या खाते असलेल्या लहान मुलांसाठी गणपती स्तोत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

तुमच्या मुलाने, मुलीने गणपती बाप्पाचे कोणतेही स्तोत्र किंवा आरती म्हणताना व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवावा असे आवाहन आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले आहे.

5 ते 9 वर्षे व  10 ते 13 वर्षे अश्या दोन गटांमध्ये ही स्पर्धा होईल.  दोन्ही वयोगटातून प्रत्येकी 3  बक्षिसे दिली जातील.  प्रथम  रोख रुपये 5,000/-  द्वितीय  रोख रुपये 3,000/- व   तृतीय  रुपये 2,000/- अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आदर्शच्या  अनन्या योजनेचा  बॉक्स व्हिडिओमध्ये दिसणे आवश्यक आहे. . सादरीकरण, स्पष्ट उच्चार आणि क्लिअर व्हिडिओ असावा.  व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.

सहभागी होण्यासाठी  https://participate.syncworks.app/submit.html या लिंकवर व्हिडीओ अपलोड करावा किंवा वॉट्स ऍप क्रमांक  9112306888 नंबरवर रील असे टाइप करून पाठवा.