घरत आळी, शास्त्रीनगर येथील देवीच्या आगमन सोहळ्यात सहभाग; रायगडच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
अलिबाग (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात अलिबाग नगर परिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी विविध देवीच्या आगमन सोहळ्यांना उपस्थिती लावत नागरिकांशी संवाद साधला. अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी आणि बळीराजाच्या भरभराटीसाठी त्यांनी देवीचरणी प्रार्थना केली.
अलिबागमधील घरत आळी येथील देवीच्या आगमन सोहळ्यात प्रशांत नाईक सहभागी झाले. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. उत्सवासाठी एकत्र आलेल्या नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला.
त्यानंतर शास्त्रीनगर येथील पोहरादेवीच्या आगमन सोहळ्यातही त्यांनी सहभाग घेतला. देवीच्या आगमनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रशांत नाईक यांनी देवीचे दर्शन घेऊन नागरिकांच्या आनंदात सहभाग नोंदविला.
“अलिबागकरांसह संपूर्ण रायगडवासीयांना सुख-समृद्धी लाभू दे आणि बळीराजाला चांगले दिवस येऊ देत,” अशी भावना प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली.
नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश या सहभागातून देण्यात आला.









