अलिबाग शहरातील वाहतूककोंडी, पाणीपुरवठा, कचरा, अतिक्रमणाची समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन
अलिबाग रायगड:अलिबाग शहरात अतिक्रमण, अनियमित पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा आदी समस्या गेल्या काही दिवसात प्रचंड वाढल्या असून यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या विरुद्ध शेकापच्या नेत्या, माजी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांनी नुकतेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांना पत्र देऊन शहरातील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. मागण्यांवर तात्काळ कारवाई सुरू न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होहोत. यामुळे नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने तत्काळ या मागण्यांची दखल घेत शहरातील समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन अॅड. मानसी म्हात्रे यांना दिले आहे. त्यामुळे शेकापचे शनिवारचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
अलिबाग शहरामधील वाहतूक व पाकींग समस्या सोडविण्यासाठी सम-विषम पार्कीग, हॉकर्स झोन रोड, नो हॉकर्स झोन, पे अॅण्ड पार्क, नो-पार्कीग, चन वे रोड इ. बाबत प्रारुप आराखडा तयार करणेत आलेला असून तो पुढील कार्यवाहीसाठी पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा यांयांच्याक सादर करणेत आला आहे. हा आरखडा मंजूर होताच अलिबाग शहरामधील वाहतूक व पार्कंगची समस्या मार्गी लागू शकेल, असे मुख्याधिकारी लेखी आश्वासनात म्हटले आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यावरील होणारी अतिक्रमणे हटविणेबाबत अलिबाग नगरपरिषदेकडील अतिक्रमण विभागाकडून वेळोवेळी कारवाई करणेत येत असून, रस्यावरील फळ / खाद्य विक्रेत्यांच्या हातगाड्या, गजरेवाले यांनी केलेली अतिक्रमणे नगरपरिषदेतर्फे हटवून शहरातील रस्ते मोकळे करणेत येत आहेत.
अलिबाग शहरामध्ये पाणी पुरवठा योजना राबविणेत येत असून, सदरील काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये विविध ठिकाणी नवीन पाण्याचे टाकीचे बांधकाम प्रस्तावित आहेत. हे काम पूर्ण होताच अलिबाग शहरामध्ये अनियमित होणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल.
पी.एन.पी. नगर येथील मच्छीमार्केट व भाजीमार्केट मधील कचरा नियमित उचलणेकामी संबंधीत ठेकेदार यांस सक्त सुचना देण्यांत आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पावसाळयापूर्वी शहरामधील गटारे -नालेसाफ करणेचे काम प्रगतीपथावर असून सदरील काम लवकरच पूर्ण होईल.
अलिबाग शहरामधील विविध समस्या सोडविणेकामी आपण केंद्रीत केलेल्या प्रश्नांवर विशेष लक्ष देण्यांत येईल, असेही मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन शेकाप नेत्या अॅड. मानसी म्हात्रे यांना दिले आहे. त्यामुळे शनिवारचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती अॅड. म्हात्रे यांनी दिली.









