श्रीबाग-म्हाडा कॉलनी सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ


नगरसेवक ॲड. संदीप पालकर आणि नगरसेविका ॲड. श्वेता पालकर यांच्या प्रयत्नांना यश

अलिबाग (प्रतिनिधी) : श्रीबाग आणि म्हाडा कॉलनी परिसराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीने सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक ॲड. संदीप पालकर आणि नगरसेविका ॲड. श्वेता पालकर यांच्या प्रयत्नातून श्रीफळ वाढवून करण्यात आला.

श्रीबाग आणि म्हाडा कॉलनी परिसर अधिक सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक व्हावा, तसेच परिसराच्या सौंदर्यात भर पडावी, या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच परिसराचा नियोजनबद्ध विकास साधण्याच्या दृष्टीने हे सुशोभीकरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नगरसेवक ॲड. संदीप पालकर आणि नगरसेविका ॲड. श्वेता पालकर यांनी आपल्या प्रभागातील विविध नागरी समस्या सोडविण्यासह परिसराच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीबाग-म्हाडा कॉलनीच्या मध्यवर्ती भागातील सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या शुभारंभप्रसंगी श्रीबाग व म्हाडा कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक श्री. जगदीश कवळे, जितेंद्र जैन, वैभव नाईक, श्री. वाणी, तसेच कामाचे ठेकेदार श्री. बंड्या भगत आणि निखिल तबीब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून प्रभागातील विकासकामांना गती मिळत असल्याचे या उपक्रमातून दिसून येत आहे. ‘आपलं श्रीबाग-म्हाडा सुशोभीकरण’ या संकल्पनेतून परिसर अधिक सुंदर आणि आकर्षक बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे.