मुंबई-ठाणे शिधावाटप विभागाची मोठी कारवाई; ९४ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


नवी मुंबई (अमुलकुमार जैन): नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई चंद्रकांत डांगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे. डिझेल पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टँकर क्रमांक WB 19 L 2981 च्यावरील टॅंकच्या आउटलेटमधून अवैधरित्या डिझेल काढून टँकर क्रमांक MH 46 BM 9202 या टँकरच्या इंधन टाकीमध्ये टाकत असताना धाड टाकण्यात आली. या कारवाईदरम्यान दोन टँकरसह टँकरमध्ये असलेला सुमारे 14,000 लिटर्स डिझेल व 25,000 लिटर्स पेट्रोलियम सदृश्य द्रवपदार्थ जप्त करण्यात आला आहे.

कारवाई दरम्यान जप्त मुद्देमाल

दोन टँकरसह अंदाजे 14,000 लिटर्स डिझेल व 25,000 लिटर्स पेट्रोलियम सदृश्य द्रवपदार्थ.

जप्त मुद्देमालाची एकूण किंमत

जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजित 94 लाख 36 हजार 708 रुपये इतकी आहे.

या प्रकरणी दोन्ही टँकरचे चालक-मालक यांचे सह समीर सरोज नामक अवैध व्यवसायाचे मालक अशा पाच इसमाविरुद्ध तुर्भे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि करवाई नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालयाच्या भरारी पथकातील सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप निरीक्षक अमोल बुरटे, दिपेंद्र परुळेकर, राहुल इंगळे व विकास नागदिवे तसेच बेलापूर शिधावाटप कार्यालयाच्या शिधावाटप अधिकारी छाया पालवे, शिधावाटप निरीक्षक प्रकाश पराते, सचिन हेंबाडे, विक्रम धुमाळ व सागर गराडे उपस्थित केली.

या प्रकरणाचा पुढील तपास तुर्भे पोलीस ठाणे यांच्याकडून केला जात आहे.