अलिबाग (प्रतिनिधी): आयुष्यमान डिजिटल मिशन अंतर्गत रायगड जिल्हा रुग्णालयाने द्वितीय क्रमांक मिळवित राज्यस्तरीय सन्मान प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे महाड ग्रामीण रुग्णालयाचे काम जिल्ह्यात पहिल्यास्थानी आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुंबई येथे रविवारी ता.22 वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
रायगड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, मेट्रेन गायत्री म्हात्रे यांच्यासह जिल्हा रुग्णालयाचे परिचारिका, डॉक्टर यांनी पुरस्कार स्वीकारला. राज्याच्या आरोग्य विभागातर्फे आयुष्यमान डिजिटल मिशन सुरू केले होते. जिल्हा रुग्णालयाने यंत्रणा कार्यान्वित केली होती. त्यामुळे रुग्णाच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. महाड ग्रामीण रुग्णालयालाही पुरस्कार प्राप्त झाला आहे. ओपीडी, आयपीडी, प्रसूती, शस्त्रक्रिया, चाइल्ड केअर, प्रसूतीनंतर केलेली गरोदर माता आणि बालकांची कांची काळजी रुग्णालयातर्फे घेतली गेली होती. त्यामुळे महाड ग्रामीण रुग्णालयाला जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
**********
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन गुरव यांना ग्रामीण भागातील जनतेला राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत दर्जेदार आरोग्य सेवा दिल्याबद्दल तसेच सन 2024-25या वर्षात उल्लेखनिय कामगिरी करीत सर्वात जास्त मानधन मिळविणा-या पनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अजिवलीमधील कोळखे उपकेंद्र अंतर्गत विचुंबे गावातील आशा स्वयंसेविका अर्चना भोईर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.









