मुंबई (प्रतिनिधी): आंध्र प्रदेशातील मार्कापुरम येथे झालेल्या भीषण अपघातात ८ प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बस आणि डंपर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत घडली. धडकेनंतर बसला आग लागल्याने काही प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.





