अलिबाग (प्रतिनिधी): राज्यातील सीबीएसई दहावी शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी ( दि. १५ ) ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये अलिबाग तालुक्यातील पीएनपी होली चाईल्ड वेश्वी सीबीएसई स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले.
पीएनपी सायरस पुनावाला स्कूल नागावचा ९३% निकाल तर पीएनपी वाय.एम.पी. सांबरी सीबीएसई स्कूलचा निकाल ८६% लागला आहे आणि पीएनपी सायरस पुनावाला स्कूल नागावची विद्यार्थिनी सिया सचिन राऊळ हिने ९०.६०% गुण मिळवून संस्थेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई स्कूल वेश्वीचा विद्यार्थी अमीर अली खान याने ९०% गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. मनस्व मधुकर थळे याने ८८.२% गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आणि विधी जितेंद्र निगडे हिने ८६% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. आमदार जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी होली चाईल्ड वेश्वी शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, सायरस पुनावाला नागाव शाळेच्या मुख्याध्यापिका गीतिका भूचर आणि पीएनपी वायएमपी शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा दुबे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून भरभरून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.






