
अलिबाग (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल, आसाम तसेच इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाचा आनंद अलिबाग शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडले, मिठाई वाटप केली आणि जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष केला.
या आनंदसोहळ्यात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. “भारत माता की जय”, “भाजपचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नागरिकांनाही मिठाई देत आनंदात सहभागी करून घेण्यात आले.
या वेळी नगरसेवक ॲड. अंकित बांगेरा, अलिबाग शहराध्यक्ष राजेश प्रधान, युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील गाडे यांच्यासह सुनील दामले, निखिल चव्हाण, जयेश पवार, कोटियन, इफ्तिकार अत्तर, पेरेकर, आदित्य जैन, आदित्य नाईक आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सर्वांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. तसेच आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक मेहनत घेण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला.






