अलिबाग- मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि प्रत्येकाला न्याय देणारे लोकनेते आहेत, असे मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी व्यक्त केले.
राजकारणात अनेक नेते येतात, मात्र कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे नेते फार कमी असतात. महेंद्रशेठ दळवी यांनी आपल्या कार्यपद्धतीतून हे सिद्ध केले आहे. मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, ही त्यांची खास ओळख बनली आहे.
कोणत्याही पक्षातील अथवा सामान्य नागरिकांच्या समस्या असोत, त्या सोडवण्यासाठी महेंद्रशेठ नेहमी तत्पर असतात. विकासकामांबरोबरच माणुसकी जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळेच युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास आणि आपुलकी आहे.
राजाभाई केणी यांनी सांगितले की, “कार्यकर्त्यांचा सन्मान आणि जनतेची सेवा हेच महेंद्रशेठ दळवी यांचे खरे बळ आहे. त्यामुळेच आज ते जनतेच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत.”
Home ताज्या बातम्या आमदार महेंद्रशेठ दळवी म्हणजे कार्यकर्त्यांना न्याय देणारे नेतृत्व : राजाभाई केणी






