कार्यकर्त्यांना चित्राताई वाघ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन


पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यप्रशिक्षण महाभियानात संघटन बळकटीचा मंत्र
अलिबाग (प्रतिनिधी): पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यप्रशिक्षण महाभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या व्यवहारिक सत्रात आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या सत्राला विविध भागांतील पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि युवा कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती.
यावेळी बोलताना चित्राताई वाघ यांनी संघटनात्मक कार्य अधिक सक्षमपणे आणि प्रभावी पद्धतीने कसे राबवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जनसामान्यांशी सातत्यपूर्ण संवाद राखणे, त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करणे, तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जबाबदारीची भूमिका निभावणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला शक्तीचे संघटन, तळागाळातील कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण आणि प्रभावी नेतृत्व निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक विचार, शिस्त आणि जनसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन केले. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घेत नव्या उमेदीने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.