अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा प्रतोद अमित नाईक यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांची महत्वपूर्ण भेट घेतली. या भेटीत रायगड जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, विकासकामे, जनतेच्या अपेक्षा तसेच आगामी काळातील धोरणात्मक दिशा यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक पातळीवर बदलत असलेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, रोजगारनिर्मिती, पर्यटन विकास आणि विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जनतेच्या हिताला प्राधान्य देत विकासकामांना अधिक गती देण्यासाठी समन्वयाने काम करण्याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या भेटीनंतर रायगडमधील आगामी राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Home ताज्या बातम्या रायगडच्या राजकारणाला वेग; उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्यासोबत अमित नाईक यांची महत्वपूर्ण भेट





