
अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील आवास येथील क्रीडा संघटक अभिजित राणे यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तर्फे दिला जाणारा ‘कृतज्ञता; पुरस्कार राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले . यावेळी राज्य कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष तथा माजी मंत्री श्री. गजानन कीर्तीकर, उपाध्यक्ष आमदार भाई जगताप, आमदार सर्वश्री किरण भैया सामंत, आमदार प्रमोद जठार, माजी आमदार दिनकर पाटील, राज्य कबड्डी असोसिएशन चे सरकार्यवाह माधव गायकवाड, खजिनदार मंगल पांडे व क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्यांच्या घरात खेळाचा वारसा असलेले आवास चे सरपंच रणजित राणे हे क्षात्रैक्य समाजाचे उपाध्यक्ष, रणजित राणे सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष, हितवर्धक मंडळाचे सदस्य ही महत्त्वाची पदे भूषवित असतांना त्यांनी आवास येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन, त्यांच्याकडे दातृत्व असल्याने त्यांनी आवास येथे राज्य कबड्डी संघाचे सराव शिबीराचे आयोजन केले. राज्यातील खेळाडुंना आवास हे ठिकाण आवडल्याने पुन्हां एकदा राज्य संघाचे सराव शिबीराचे आयोजन, रायगडच्या कबड्डी लीग मधे संघ मालक त्यांच्या संघाने उपविजेतेपद मिळविले. राज्याने आयोजन केलेल्या शिबीरात सहभागी झालेल्या व राज्य संघात खेळलेल्या खेळाडुंनी राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सव, हिंदकेसरी बैलगाडी स्पर्धा, कुस्ती स्पर्धेचे आयोजन करुन तसेच अनेक स्पर्धा वरून आपल्या माध्यमातून तरुण खेळाडुंना खेळाचे व्यासपिठ मिळवू दिले.
या महत्वाच्या कार्यामुळे राज्य कबड्डी असोसिएशने याची दखल घेऊन त्यांना राज्याचा महत्वाचा ‘कृतज्ञता’ पुरस्कार देऊन क्रीडा क्षेत्रात रायगडचे नाव उज्वल केले आहे. या मिळविलेल्या यशाबद्दल राज्य कबड्डी असोसिएशन चे मा. सरकार्यवाह अॅ ड. आस्वाद पाटील, रायगडच्या सरकार्यवाह श्रीमती डॉ. चित्रा ताई पाटील, सहकार्यवाह श्री. जे जे पाटील, पंच मंडळाचे प्रमुख तथा आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक श्री. शरद कदम, छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे, सुर्यकांत ठाकूर, संजय म्हात्रे, आशिष म्हात्रे, राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल व असोसिएशन चे सर्व पदाधिकारी, सदस्य, पंच व विविध संघटनाचे पदाधिकारी, खेळाडू तसेच राजकीय, क्रीडा, शैक्षणिक व अन्य क्रीडा प्रेमी नागरीक यांनी पुरस्कार प्राप्त रणजित राणे यांचे अभिनंदन केले आहे






