पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त दक्षिण रायगड भाजपकडून अभिवादन


अलिबाग (प्रतिनिधी) : एकात्म मानववादाचे प्रणेते, महान विचारवंत आणि भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्ह्याच्या वतीने अलिबाग येथील जिल्हा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजेत, हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. त्यांनी मांडलेला ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ हा विचार आजही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला अलिबागचे नगरसेवक ॲड. अंकितदादा बंगेरा, अलिबाग शहर उपाध्यक्ष कृष्णनाथ चाळके, अलिबाग पंचायत समिती सदस्य सौ. प्रियदर्शनी संजय पाटील, भाजपा सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष राजेंद्र बोराडे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. आशाताई बोराडे, दर्शन पाटील, अस्मिता नागे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचालीसाठी मांडलेले विचार समाजाच्या शेवटच्या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या विचारांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले.