अलिबाग (प्रतिनिधी) : शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे अलिबाग नगर परिषदेतील विरोधी पक्ष नेते तथा अलिबाग शहर प्रमुख ॲड. संदीप पालकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. अलिबाग शहरातील गोविंद बंदर येथील शेकापचे कार्यकर्ते इस्माईल मोईद्दीन अब्दुल्लाह सय्यद, सलाउद्दीन गायसूद्दीन शाह, कामरुद्दीन गायसूद्दीन शाह आणि संपूर्ण परिवाराने पक्षांतर केले. यावेळी शिवसेना जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, जिल्हा सह संघटक अजित पाटील, अलिबाग विधानसभा प्रवक्ते धनंजय गुरव, अलिबाग समन्वयक हेमंत पाटील, अकबर मुजावर, अलिबाग शहर संपर्क प्रमुख मंगेश म्हात्रे, उपशहर प्रमुख वसंत जैन, मिलिंद खानोलकर, वैभव नाईक, जितेंद्र जैन, नितीन रहाटे, सीताराम काजवे आदी शिवसैनिक उपस्थित होते.








