‘ब्रँड अलिबाग’साठी प्रशांत नाईक मैदानात; समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन सुविधांची पाहणी

format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;?runfunc: 0; algolist: 0;?multi-frame: 1;?brp_mask:0;?brp_del_th:0.0000,0.0000;?brp_del_sen:0.0000,0.0000;?motionR: 1;?delta:1;?bokeh:1;?module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 13107200;cct_value: 0;AI_Scene: (200, 0);aec_lux: 138.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 32;


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबागच्या पर्यटनाची प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी अलिबाग नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी अलिबाग समुद्रकिनाऱ्याची पाहणी करून पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या वॉकवे कॅनोपी (निवारा शेड)सह विविध सुविधांची तपासणी केली. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या कॅनोपीची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

२२ जुलै रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वॉकवे कॅनोपीच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्याची त्वरित दखल घेत प्रशांत नाईक यांनी प्रत्यक्ष समुद्रकिनाऱ्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बसण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता तसेच पर्यटकांसाठी उपलब्ध इतर सुविधांचीही पाहणी करण्यात आली.
प्रशांत नाईक म्हणाले की, सभेत मांडलेल्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. अलिबाग हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र असल्याने पर्यटकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व सुविधा सुस्थितीत ठेवण्यावर भर दिला जाईल. ‘ब्रँड अलिबाग’ची ओळख अधिक बळकट करण्यासाठी पर्यटन सुविधांची नियमित पाहणी, देखभाल आणि दुरुस्ती मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.