चांगू घरत यांच्या कुटुंबियांनी मानले तहसीलदारांचे आभार


अलिबाग(प्रतिनिधी):अलिबाग -रोहा मार्गावरील मौजे वेलवली-खानाव हद्दीतील रस्त्यावरील मोठे बगदाड न बुजविल्याने वेलवली गावचे चांगू कमळू घरत या शेतकऱ्याचा जुलै महिन्यात अपघाती मृत्यू झाला होता,
चांगू घरत यांच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळेच मृत्यू झाल्यामुळे पीडित चांगू घरत यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते अँड राकेश पाटील, खानाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश गायकर व वेलवली व खानाव गावचे परिसरातील नागरिकांन घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी श्री पराते यांनी मयत चांगू घरत यांच्या कुटुंबियांना १५लाख रुपयांची मदत सर्वांच्या समोर जाहीर केली होती,
त्याच वेळी उपस्थित असलेल्या अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांना अँड राकेश पाटील यांनी विनंती केली की, महसूल विभागाच्या वतीने ही तत्काळ मदत करावी,
अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून तो मंजूर करून मयत चांगू घरत यांच्या कुटुंबियांना महसूल विभागाच्या वतीने रक्कम रुपये ४लाख रुपयांची मदत केली. त्यामुळे मयत चांगू घरत यांच्या कुटुंबियांच्या वतीने तहसीलदार विक्रम पाटील यांचे आभार मानण्यात आले.
**********
घटनेच्या दिवशीच मा.तहसीलदार साहेबांकडे आम्ही मयत चांगू घरत यांच्या कुटुंबियांना महसूल विभागाच्या वतीने मदत मिळण्यासाठी विनंती केली होती, साहेबांनी सांगितले की, कागतपत्रांची पूर्तता झाली तर शासन नक्कीच मदत करेल, महसूल विभागाच्या वतीने पीडित कुटुंबाला ४ लाखांची मदत करण्यात आली, मदत करणाऱ्याचे आभार मनाने मानणे हे आम्ही कर्तव्य समजतो तहसीलदार विक्रम पाटील साहेबांचे आभार
अँड. राकेश नारायण पाटील सामाजिक कार्यकर्ते