मुनवली येथे दहीहंडी सण उत्साहात साजरा


सोगाव  (अब्दुल सोगावकर) : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दहीहंडी उत्सव अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुनवली येथे स्थानिक गोविंदानी सकाळपासूनच पारंपरिक ‘गोविंदा आला रे आला’ व इतर पारंपरिक गीतांच्या व संगीत वाद्याच्या ठेक्यावर साखळी धरून एकूण ७ पेक्षा जास्त दहिहंड्या फोडत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यापूर्वी ग्रामस्थांनी आदल्या दिवशी श्री. हनुमान मंदिरात सकाळी नऊ ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत २४ तासांचे भजन सप्ताहाचे आयोजन केले होते. यावेळी दहीहंडी उत्सव आनंदात व शांततेत साजरा करण्यासाठी मुनवली ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व त्यांच्या मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांनी विशेष काळजी घेतली. या उत्सवात बाळ गोपाळांसोबत तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक व महिलावर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.