शेकाप शेतकरी सभेतर्फे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीभरपाईसाठी अलिबाग तहसीलदार यांना निवेदन


अलिबाग रायगड: अवकाळी पावसाने रायगड भागात नुकत्याच आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके, फळबागा आणि घरांवर याचा गंभीर परिणाम झाला असून, या पार्श्वभूमीवर शासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात आली आहे.

शेकापचे अलिबाग तालुका शेतकरी सभा अध्यक्ष अनिल गोमा पाटील यांनी तहसीलदार, महसूल विभाग, अलिबाग यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की, मे २०२५ मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेषतः वाऱ्यामुळे केळी, भाजीपाला, आंबा,नारळ यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी पाण्याच्या पाइपलाइन व झाडांवरही मोठे नुकसान झाले आहे.
याच अवकाळी पावसामुळे मच्छिमारी सुद्धा आमकाही दिवस आधी बंद करावी लागल्याने मच्छिमारांचे सुद्धा आर्थिक नुकसान झाले आहे. त्यावर सुद्धा विचार व्हावा असे सांगण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख ऍड मानसी ताई म्हात्रे, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, दिगंबर म्हात्रे, सुशील पाटील, शरद वरसोलकर, रवींद्र म्हात्रे, विलास म्हात्रे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने प्रशासनाकडे विनंती केली आहे की, तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जावी व मधमाशी प्रकोपावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात.