“एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे वृक्षारोपण


अलिबाग(प्रतिनिधी): “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेअंतर्गत श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग आणि स्वयंसिद्धा संचलित स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा युवा अधिकारी श्री. अमित पुंडे यांनी केले, तर प्रमुख नेतृत्व प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त (भारत सरकार) श्रीमती तपस्वी गोंधळी यांनी केले.

कार्यक्रमाला स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी आशिष कोळी, विराज थळे, राज म्हात्रे, समीक्षा तांडेल, राज दळवी आणि अंजली पेडणेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रिझम संस्थेच्या प्रणाली तळेगावकर व सानिका भगत यांच्यासह स्पर्धा विश्व अकॅडमीचे अनेक विद्यार्थी देखील उपस्थित होते.

या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत नव्या पिढीत वृक्षारोपणाची जाणीव निर्माण झाली.