रायगड (प्रतिनिधी): आज, दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे ‘चालक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान चालकांना रस्ता सुरक्षा व वाहतुकीशी संबंधित महत्त्वाचे नियम आणि जबाबदाऱ्यांविषयी प्रबोधन करण्यात आले. वाहतुकीची जबाबदारी, प्रवाशांचा सुरक्षित प्रवास आणि रस्त्यावरील शिस्त राखण्यात चालकांचे मोलाचे योगदान असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
चालकांचे कर्तव्य, सुरक्षित वाहन चालवण्याचे नियम, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करून त्यांचे वाहतुकीतील महत्त्व पटवून दिले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी चालकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांना सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश दिला. तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी, सुजित जामकर, चेतन अडकटलवार यांनीही चालकांसाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब सोळंकी यांनी केले.
याप्रसंगी स्वप्नील ससाणे, शुभांगी गायकवाड, श्वेता शेळके आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम चालकांमध्ये जागरूकता वाढवणारा ठरला. रस्ता सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.









