खोपोली (दिनकर भुजबळ): रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. आंचल दलाल यांच्या आदेशानुसार व खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली–खालापूर फूड मॉल येथे महिला सक्षमीकरण विषयक सत्र पार पडले.
या सत्रात महिलांना सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, हनी ट्रॅप, फेसबुक स्कॅम, सोशल मीडियाचा योग्य वापर तसेच डायल ११२ वुमन हेल्पलाईन आणि सायबर सुरक्षा हेल्पलाईन १०९ विषयी माहिती देण्यात आली. महिलांना जागरूकता व आत्मनिर्भरतेचा नवा आत्मविश्वास या मार्गदर्शनातून मिळाला.
सौ. आंचल दलाल यांच्या संवेदनशील पुढाकारामुळे आणि सचिन हिरे यांच्या लोकाभिमुख नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. समाजातील महिलांना सुरक्षितता व आत्मभान देण्याच्या या प्रयत्नांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमात खोपोली पोलीस ठाण्याच्या महिला हवालदार संजना चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सुषमा खाडे तसेच महिला दक्षता समितीच्या सदस्या वर्षा मोरे व इशिका शेलार उपस्थित होत्या.
या उपक्रमासाठी फूड मॉलचे मुख्य कार्यकारी मोहम्मद रमीझ रजा व अभिजीत लक्ष्मण राऊत यांनी खोपोली पोलिसांचे विशेष आभार मानले.









