सोगाव (अब्दुल सोगावकर) :अलिबाग तालुक्यातील सोगाव आदिवासी वाडीवर गेले नऊ दिवस नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नऊ दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
नवरात्रोत्सव निमित्ताने नऊ दिवस विविध सामाजिक व राजकारण क्षेत्रातील मान्यवरांनी दुर्गामातेचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी उशिरा वाजतगाजत देवीचे विसर्जन मिरवणुकीनंतर विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणूकीमध्ये डीजे वाद्य, टेंम्पो, जनरेटर व इतर सर्व खर्च सामाजिक बांधिलकी म्हणून मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, साहिल कुर यांनी केले. याबाबत आदिवासी बांधवांनी आभार मानले.









