रायगड (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंडित शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सौ. भावनाताई पाटील यांनी घोसाळे जिल्हा परिषद गटामधील चेनेरा विभागात खारगाव, आरेखुर्द, शेडसई, चांडगाव, दीव, कोकबन या ठिकाणी गाव भेटी दिल्या. सदर भेटीमध्ये या गावांमध्ये दहा वर्षा आधी पंडितशेठ आमदार असताना त्यांनी बांधलेले समाज मंदिरे, रस्ते आणि पाणी पुरवठा यांची दुरावस्था पाहायला मिळाली. माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात मी केलेल्या विकास कामांची साधी दुरुस्ती ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी यांनी केली नाही. या बाबत खेद व्यक्त करून यासर्व कामांची दुरुस्ती आता मीच पुन्हा करेन असा शब्द पंडित शेठ पाटील यांनी गावातील नागरिकांना दिला.
त्यावेळी उपस्थित असलेले चेनेरा विभाग अध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले की,आम्ही कार्यकर्ते म्हणून जेव्हा गावोगावी भेट देतो, तेव्हा तेथील जनताच आम्हाला पंडित शेठ यांनी आमच्या गावात याआधी कोण कोणती विकास कामे केली हे सांगतात. त्यामुळे आम्हाला आमच्या नेत्याचा प्रचार करण्यासाठी आटापीटा करावा लागत नाही. त्यामुळे येणाऱ्याकाळात या विभागात पंडीत शेठ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे.
तसेच सदर गावभेटी मधे उपस्थित असलेले युवा मोर्चा उपाध्यक्ष नंदेशदादा यादव यांनी गावातील रखडलेली आणि नव्याने करण्यासारखी विकास काम यांची नोंद करून पंडित शेठ पाटील ही कामे वेळेत करतील असा विश्वास दर्शविला.
त्यासाठी सौ. भावनाताई पाटील यांनी जनतेने कोणत्याही आमिषाला बळी न पडता. यावेळी घोसाळे जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला निवडून द्यावे अशी विनंती केली.
चनेरा, घोसाळे अणि यशवंतखार विभागातील मतदारांनी सौ. भावनाताई पाटील यांना निवडून दिल्यास पुन्हा एकदा लोकनेते पंडितशेठ पाटील यांच्या आगमनाने चेनेरा विभाग विकासाकडे वाटचाल करेल अशी आशा जनतेमध्ये निर्माण झाली आहे, असे मत पत्रकार जितेंद्रजी जोशी यांनी व्यक्त केलं.
सदर गाव भेटीमध्ये पक्षाचे कार्यकर्ते यज्ञेश भांड , वसंत शेलार, स्वप्नील सानप, मोतीराम म्हात्रे, मंगेश मोहिते, स्वप्नील सावंत, बालकृष्ण पाटिल, गंगाराम पाटील, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुहास भगत, नारायण गायकर, रणजीत भोपी इत्यादी उपस्थितीत होते.









