मुंबई (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या जखमेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी अलिबाग येथे प्रवीण ठाकूर यांची भेट घेऊन निघताना त्यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती त्यांनी दिली.
दरवाजा लावत असताना अचानक झालेल्या अपघातात त्यांच्या बोटाला इजा झाली. तत्काळ त्यांनी रोहा येथील सोंडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. तेथे डॉक्टरांनी जखमेवर टाके घालत आवश्यक उपचार केले. या घटनेनंतरही तटकरे यांनी आपले नियोजित दौरे कायम ठेवले. दिल्लीला गेले असताना देखील त्यांच्या बोटावर जखम व पट्टी स्पष्टपणे दिसत होती, ज्याची साक्ष अनेकांनी दिली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अपघाताला वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न काहींकडून होत असल्याचे त्यांनी खेदाने सांगितले. “ही एक दुर्दैवी अपघाती घटना होती. त्यात कोणताही राजकीय किंवा अन्य संदर्भ जोडणे चुकीचे आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी अफवांना पूर्णविराम देण्याचे आवाहन केले.
तटकरे यांच्या या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या जखमेभोवती निर्माण झालेल्या चर्चांना उत्तर मिळाले असून, त्यांनी वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
Home ताज्या बातम्या बोटाच्या जखमेवरून सुरू असलेल्या चर्चांना सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण; “अपघाताला वेगळा अर्थ...





