वरसगाव येथील श्रीमती गीता द तटकरे विद्यालयाचा एसएससी निकाल ८७.५० टक्के


कोलाड (नेहल प्रधान): रोहा तालुक्यातील वरसगाव येथील श्रीमती गीता द तटकरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा एसएससी परीक्षेचा निकाल ८७.५० टक्के लागला असून विद्यालयाने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा यशाचा टक्का गाठता आल्याची भावना विद्यालय प्रशासनाने व्यक्त केली.
यंदाच्या परीक्षेत कु. वैष्णवी नितीन घाग हिने ७०.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. सिस्टरा मोहन थापा हिने ६७.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. विद्या हिमाजी पवार हिने ६३.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच कु. प्रियाल राम बांकर हिने ६० टक्के आणि कु. रिया सुशिल काडे हिने ५८.८० टक्के गुण मिळवत यश संपादन केले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्री संदीपजी तटकरे तसेच सचिव श्री प्रकाशजी सर्कले व सर्व शिक्षकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.