अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर असोसिशन शी संलग्न असलेल्या – अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वटपौर्णिमा या पारंपरिक सणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘वटपौर्णिमा’ या विषयावर आधारित भव्य फोटोग्राफी व रील मेकिंग स्पर्धा उत्साहात पार पडली.
गोकुळेश्वर तलाव येथे ही स्पर्धा आयोजित आयोजित केली होती.
तालुक्यातील 14 फोटोग्राफर आणि 8 रील स्टार या स्पर्धेत सहभागी झाले होते.
मेकअप आर्टिस्ट मृणाली कांबळे, ड्रेस डिझायनर प्रितेश भगत यांनी तयारी केलेल्या सृष्टी पाटील आणि अर्पिता कवजी या माडेल चे
फोटोग्राफर्स नी काढलेल्या फोटोच्या प्रिंट आणि रील हॉटेल गुरुप्रसाद च्या सभागृहात परीक्षणासाठी लावण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध फोटोग्राफर संदीप वाटवे आणि नितीन पाटील यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
फोटोग्राफी स्पर्धेत अक्षय हिवाळे याने प्रथम क्रमांक, निशांत मढवी द्वितीय आणि विराज घरत याने तृतीय क्रमांक पटकवला.
रील स्पर्धेत निशांत मढवी याने प्रथम क्रमांक, कल्याण पाटील द्वितीय आणि मयुरेश पाटील याने तृतीय क्रमांक पटकवला.
विजयी स्पर्धकांना तरुण उद्योजक संदीप गायकवाड, रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, ज्येष्ठ फोटोग्राफर सुरेश खडपे, सचिन आसराणी, अतुल वर्तक यांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमर मढवी, निलेश दुदम यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच अलिबाग फोटो असोसिएशनचे सदस्य विजय पाटील विराज घरत वैभव शिंदे दीपेश पाटील सुमित मालोदे सुरेश पाडावे राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते





