सोगाव (अब्दुल सोगावकर) :डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या शिक्षक दिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व घाडी बंधू यांच्या वतीने मुनवली येथील हनुमान मंदिरात शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता मुनवली व सोगाव येथील विविध शाळेत शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सोगाव उर्दू अंगणवाडी सेविका रिजवाना मुल्ला, मदतनीस सुरय्या सय्यद, उर्दू हायस्कूल शिक्षिका सॉलिहा चौधरी, नेहा कांबळे(घोडपकर), अदिती हरवडे, कृतिका कदम, अक्षता कदम, असिफा कुर, शिक्षक शैलेश तिर्लोटकर, अजित हरवडे तसेच मापगाव केंद्रातुन आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार जाहीर झालेले जिल्हा परिषद शाळा सोगाव चे शिक्षक अनिल नाईक यांच्यासह इतर शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व घाडी बंधू दरवर्षी आपल्या परिसरातील सर्व शिक्षकांचा न चुकता सन्मान करत असतात. याहीवर्षी त्यांनी शिक्षकांचा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मान्यवरांसह उपस्थित शिक्षक अजित हरवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले, तसेच हा सन्मान सोहळा दरवर्षी साजरा करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व घाडी बंधू यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा समाजसेवक प्रकाश वडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व घाडी बंधूंचे विशेष कौतुक केले. दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व घाडी बंधू यांच्यावतीने शिक्षकांचा सन्मान केला जातो आहे, असे कार्यक्रम आयोजित करून आपण शिक्षकांचा सन्मान करत त्यांचे मनोबल वाढवत आहात, हे खूपच कौतुकास्पद आहे. आपण यापूर्वी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा आदी समाजपयोगी व लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करत आहात, तेसुद्धा कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश वडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक दिलीप मोंढे, आत्माराम पंडम, अरविंद मसुरकर, अशोक मसुरकर, मधुकर सूद, गंगाराम ठकरूळ, वामन ठकरूळ, सुरेश हाके, सामाजिक कार्यकर्ते सतीश घाडी, सचिन घाडी, मापगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सानिका घाडी, संतोष बांद्रे, महेंद्र कदम, प्रविण घाडी, संदेश करमेळे, मुनावर कुर, अमोल मोंढे, निकेश अनमाने, नितेश ठकरूळ, मयूर अनमाने, प्रतीक अनमाने, सुयोग अनमाने, जयेश हाके, वेदिका मोंढे, संगीता म्हात्रे, प्रणिता अनमाने, सुलभा अनमाने, वंदना अनमाने, अहिल्या अनमाने, निर्मला पंडम, सुलोचना मोंढे, मनीषा अनमाने, संगीता अनमाने, अस्मिता अनमाने, नमिता अनमाने, संजना अनमाने, वंदना नागावकर, रीना मोंढे, सानिया घाडी यांच्यासह मुनवली पंचक्रोशीतील विद्यार्थी व महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








