दिवाळीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नगरसेवक ॲड. संदीप पालकर यांनी घेतली सदिच्छा भेट


पक्षप्रमुखांचे मार्गदर्शन आणि आशीर्वादाची थाप हीच खऱ्या अर्थाने दिवाळीची अनमोल भेट!

अलिबाग (प्रतिनिधी): दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. संदीप पालकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने ॲड. संदीप पालकर यांनी आनंद व्यक्त केला.

या सदिच्छा भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी ॲड. संदीप पालकर यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. पक्षप्रमुखांनी दिलेले मार्गदर्शन आणि पाठीवर मारलेली कौतुकाची थाप हीच आपल्यासाठी दिवाळीची सर्वात मोठी आणि अनमोल भेट असल्याची भावना ॲड. पालकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रधर्माचे रक्षण, सर्वसामान्य जनतेची सेवा आणि शिवसेनेच्या निष्ठावंत विचारांशी बांधिलकी जपत यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या भेटीच्या निमित्ताने दिवाळीचा आनंद द्विगुणित झाल्याचे सांगत ॲड. संदीप पालकर यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.